Market Committee Election : राखीव प्रवर्गातून लढणाऱ्यांचा मार्ग मोकळा; वर्षभरात जातवैधता सादर करा

Caste validity certificate
Caste validity certificateesakal

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राखीव प्रवर्गातून लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने एक वर्षाची मुदत दिली आहे. (market committee election One year time limit for submission of caste validity certificate for candidates contesting from reserved category jalgaon news)

या निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत.

बाजार समितीच्या बाजार क्षेत्रात राहणारे १५ शेतकरी कृषी पतसंस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांकडून निवडले जाणार आहेत. १५ पैकी ११ शेतकरी सहकारी संस्थेचा मतदारसंघ व चार शेतकरी ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडले जाणार आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Caste validity certificate
Inspirational News : ‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

सहकारी संस्थेच्या मतदारसंघात महिला प्रवर्गासाठी दोन, इतर मागास प्रवर्ग एक आणि विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीसाठी एक जागा राखीव आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी एक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी एक जागा राखीव आहे.

दरम्यान, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले होते. यासंदर्भात निवडणूक प्रशासनाने प्राधिकरणाला जातवैधतेसाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ही विनंती मान्य केली असून, राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता एक वर्षाची मुदत दिली आहे.

"राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणुकीनंतर एका वर्षात जातवैधता प्रमाणपत्र सादर करेल, असे हमीपत्र अर्जासोबतच द्यावयाचे आहे. निवडून आल्यानंतर बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न सादर केल्यास त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल. तसे आदेश निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत." -संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक

Caste validity certificate
Jalgaon News : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वच विभागांत धावपळ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com