Jalgaon Crime News : गृहकर्जाच्या आमिषाने विवाहितेची फसवणूक

Fraud
Fraud esakal

पाचोरा (जि. जळगाव) : येथील विवाहितेला गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून या विवाहितेची ७५ हजार ९०० रुपयांत ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कासोदा येथील कुणाल सुनील चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Married woman cheated on lure of home loan Jalgaon Crime News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Fraud
Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!

विवाहितेने गृहकर्जासाठी कुणाल चौधरी यांच्या सांगण्यावरून अर्ज केला. १५ मे ते २८ मे २०२२ दरम्यान गृहकर्जाची फाईल मंजुरीसाठी कुणाल चौधरी यांनी वेळोवेळी या विवाहितेकडून ऑनलाइन ७५ हजार ९०० रुपये घेतले. त्यानंतर गृहकर्जासंदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही.

कर्जही नाही व फाईल अथवा पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विवाहितेने पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी चौधरी याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कैलास पाटील तपास करीत आहेत.

Fraud
NMC Eastern Divisional Office : कार्यालय स्थलांतराची घाई, कामास मात्र सापडेना मुहूर्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com