वादळी पावसाने पुन्हा केळीच्या बागा जमीनदोस्त 

vadal banana nuksan
vadal banana nuksan
Updated on

रावेर ः मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे रावेर तालुक्यातील अहिरवाडी, केऱ्हाळे, मंगरूळ, पिंप्री, मोहगणसह ३५ गावातील शेती शिवारातील केळी पिक जमीनदोस्त झाली. यामुळे सुमारे १३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन कापणीवर आलेल्या केळीचे आठवडाभरात दुसऱ्यांदा नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे . 


तालुक्यातील ३५ गावांतील ५१४ शेतकऱ्यांचे ३१६ हेक्टर्स क्षेत्रावरील केळीचे १२ कोटी ६६ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. यात मोरगाव खुर्द, अहिरवाडी, केऱ्हाळे बुद्रुक, थेरोळा, खिरवड, लोहारा, निंबोल, ऐनपूर रावेर, विटवा, सांगवे, नांदूरखेडा, अजंदा या गावांत मोठे नुकसान झाले आहे. 

अहिरवाडीत सर्वाधिक नुकसान 
तालुक्यातील अहिरवाडी येथे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान असे ः गोपाळ भागवत चौधरी (२५ हजार खोड ), रवींद्र राजाराम चौधरी (१० हजार खोड), गोपाळ ओंकार चौधरी (९ हजार खोड) , रवींद्र श्यामराव महाजन, नकुल चौधरी, संजय राजाराम चौधरी, कडू तुकाराम चौधरी, राहूल प्रकाश चौधरी यांचे प्रत्येकी ( सुमारे ८ हजार खोड ), गोविंदा श्‍यामराव महाजन (४ हजार खोड), कौतिक तुकाराम सावळे (३ हजार खोड), सदाशिव तुकाराम सावळे (१५०० खोड) यांचे सह तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे केळी पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागात फिरून नुकसान पाहतांना असंख्य केळी बागा आडव्या झालेल्या पाहून शेतकरी निराश झालेला दिसत होता. 

यापूर्वी ११ जूनला दुपारी, त्याच दिवशी रात्री उशिरा आणि आता मंगळवारी तिसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने केळी उत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे. आधीच कोरोनामुळे केळीचे भाव उत्पादन खर्च भरून निघण्याएवढे नाहीत त्यात पुन्हा नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

अहिरवाडीत घरांचेही नुकसान 
अहिरवाडी येथे भिलाई नागमोडी नाल्याला पूर आल्यामुळे नदी काठावरील बाहेरपुरा व धनगर वाड्यात पाणी शिरल्यामुळे तसेच सातपुडा पर्वत पायथ्याशी असलेल्या मेंढपाळांच्या तसेच अनेक गावातील घरावरील पत्रे उडाल्यामुळे अन्न धान्याचे, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. वादळाने झाडे उन्मळून पडली. यामुळे वीजेचे खांब पडले, वीजेच्या तारा तुटल्या अहिरवाडीतील ट्रान्सफार्मरवर झाड पडल्यामुळे त्यांचे खांब वाकले . यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com