Measles Vaccination : जळगाव मनपातर्फे शहरात गोवर लसीकरण; जाणून घ्या तुमच्या परिसरातील केंद्र

Measles Vaccine
Measles Vaccinesakal
Updated on

जळगाव : गोवरची वाढती साथ रोखण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

Measles Vaccine
Measles Infection : गोवरचा धोका, वेळीच ओळखा

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात गोवरचे १६९ रूग्ण आढळून आले आहेत. त्या पैकी १२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत एक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ९ महिने ५ वर्षे वयोगटातील ज्या मुलांचे लसीकरण झालेले नसेल त्या मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन मुलांना लसीकरण करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी केले आहे.

Measles Vaccine
Measles Cases : कोरोनानंतर महाराष्ट्रावर 'गोवर'चं संकट; राज्यांत 717 रुग्ण, मुंबईत 10 मुलांचा मृत्यू

शहरातील रविवार (ता.१९) चे लसीकरण केंद्र असे : १) डॉ.तल्हार क्लिनिक, शाहू नगर, २) एसएमआयटी कॉलेज, ३) पोलिस लाइन दक्षता नगर, ४) छत्रपती शाहू महाराज रूग्णालय, ५) अलहिदा हॉस्पिटल शिवाजी नगर, ६) दादासाहेब भिकमचंद जैन रूग्णालय शिवाजी नगर, ७) डॉ. अशोक पाटील दवाखाना सुभाष चौक, ८) डॉ. राजेंद्र चौधरी दवाखाना जुनेगाव, ९) गजानन मंदिर सुप्रिम कॉलनी, १०) दत्त मंदिर सदगुरू नगर सुप्रिम कॉलनी, ११) मासुमवाडी अंगणवाडी क्रमांक ४८, १२) भिलाटी पोलिस चौकी (तांबापुरा), १३) राम नगर अंगणवाडी क्रमांक ३९, १४) सप्तश्रृंगी मंदिर, रेणुका नगर मेहरूण, १५) निमडी शाळा, पिंप्राळा, १६) ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ, रामानंद नगर, हरी विठ्ठल नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
Shalarth ID Scam
Jalgaon railway flyover latest update
An ACB team caught a Jalgaon Jamod Panchayat Samiti officer allegedly accepting a ₹25,000 bribe for clearing development work bills.
Marathi News Esakal
www.esakal.com