जळगाव- शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रस्त्यावर उभ्या ट्रकच्या टाकीतून डिझेल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी यावल तालुक्यातून अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने संशयिताचा शोध घेत त्यास अटक केली. सचिन दगडू ठाकूर (वय २५) असे अटक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.