आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती; शवविच्छेदन अहवालातून झाले उघड

या मुलीने विष प्राशन केल्यानंतर तिला जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
suicide case news
suicide case newsesakal

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : तालुक्यात आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या विच्छेदन अहवालातून ती गर्भवती असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीने विष प्राशन केल्यानंतर तिला जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान १६ जून २०२२ ला तिचा मृत्यू झाला. तेव्हा या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या मुलीच्या विच्छेदन अहवालात अल्पवयीन मुलगी ही दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest marathi news)

suicide case news
वाहरं, पोलिस दादा तुझा खेळ... अपराधी कोण अन् कोणाला जेल?

सध्या अल्पवयीन मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. तशाच प्रकारचा अत्याचार या मुलीवर करण्यात आला असल्याची शक्यता आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी श्रावण धोंडू जवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात १६ जून २०२२ ला सकाळी नऊपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. त्या संदर्भात सतरा जूनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

suicide case news
जळगावात हेलिकॉप्टर सेवा आवश्‍यक; चिखलमय रस्त्यामुळे चालणेही अवघड

याचा तपास पोलिस कर्मचारी श्रावण जवरे यांच्याकडे होता. परंतु या मुलीचा विच्छेदन अहवाल ५ जुलैला प्राप्त झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे, की ही पीडित अल्पवयीन मुलगी ही साधारणतः दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे अज्ञाताविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर हे तपास करीत आहेत.

suicide case news
Jalgaon | शेतमजूर तरुणाची तरसोदला आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com