Jalgaon News : चंद्र- शुक्र पिधानयुतीचा येणार अनुभव; जाणून घ्या पिधानायुती म्हणजे काय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

miracle of conjunction of Moon and Venus is going to happen on 24 march jalgaon news

Jalgaon News : चंद्र- शुक्र पिधानयुतीचा येणार अनुभव; जाणून घ्या पिधानायुती म्हणजे काय...

जळगाव : चंद्र आणि शुक्राच्या (Moon and Venus) पिधानयुतीचा अद्‌भूत चमत्कार शुक्रवारी (ता. २४) घडणार आहे. या पिधानयुतीची सुरवात दुपारी ४ वाजून १२ मिनिटांनी होऊन ५ वाजून ५१ मिनिटांनी संपणार आहे. (miracle of conjunction of Moon and Venus is going to happen on 24 march jalgaon news)

त्यावेळी आकाशात सूर्य असल्यामुळे आपल्याला पिधानयुती बघता येणार नाही. मात्र, सूर्यास्तानंतर चंद्र आणि शुक्र यांच्या युतीचा सुंदर नजारा आवश्य बघायला मिळणार आहे.

पिधानायुती म्हणजे काय ?

आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती आहे. मात्र, पिधानयुती हे एक प्रकारचे ग्रहणच असते. जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला, की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, की चंद्रग्रहण होते, तसेच चंद्र ज्यावेळी एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो. याला पिधानयुती (Occultation) असे म्हणतात.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मुळात, चंद्र रोज कोणत्या ना कोणत्या ताऱ्यासमोरून जातो, पण क्वचित प्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अद्‌भूत आणि प्रेक्षणीय चमत्कार बघायला मिळतो.

सर्व खगोलप्रेमींना चंद्र आणि शुक्र यांच्या युतीचा खगोलीय अद्‌भूत नजारा टेलिस्कोपमधून बघण्याचा आनंद घेता यावा, यासाठी मु. जे. महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या गच्चीवर जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मु .जे. महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सहापासून करण्यात आले आहे. खगोलप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभ्यासक अमोघ जोशी व प्राचार्य एस. एन. भारंबे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonmoonastronomical