
Jalgaon Missing Case : एरंडोल येथील विवाहिता मुलासह बेपत्ता
एरंडोल (जि. जळगाव) : येथील गांधीपुरा भागातील रहिवासी असलेली २५ वर्षीय विवाहिता आपल्या पाच वर्षांच्या मुलासह कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. याबाबत माहिती अशी, गांधीपुरा भागातील विवाहिता हर्षदा किरण मराठे (वय २५) ही विवाहिता तिचा मुलगा सोहम (वय ५) याला घेऊन काल (ता. २२) दुपारी घरात कोणालाही न सांगता निघून गेली आहे. (Missing woman with child from Erandol Jalgaon news)
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
विवाहितेचा पती व तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, विवाहिता व मुलगा कुठेही मिळून न आल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. हर्षदा मराठे हिची उंची पाच फूट असून रंग गव्हाळ, शारीरिक बांधा मजबूत आहे. तिच्या डाव्या हातावर इंग्रजीत ‘एचके’ ही अक्षरे गोंधलेली आहेत.
तिने अंगात लाल रंगाची साडी परिधान केली आहे. मुलगा सोहमची उंची दोन फूट असून चेहरा गोल, रंग गोरा असून शारीरिक बांधा सडपातळ आहे. याबाबत किरण महादू मराठे यांनी दिलेल्या पोलिसात दिलेल्या माहितीवरुन हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व सहकारी तपास करीत आहेत.