Jalgaon News : बोरीतून सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन : आमदार पाटील

MLA Chimanrao Patil while guiding the canal advisory committee meeting. Neighbor officials and government officials.
MLA Chimanrao Patil while guiding the canal advisory committee meeting. Neighbor officials and government officials.esakal

Jalgaon News : खरीप हंगाम वाया गेला असून, तालुक्यातील बोरीलगत असलेल्या परिसरासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम चांगला जावा, यासाठी बोरी प्रकल्पातून सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी असे दोन आवर्तन सोडावे, अशा सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्यात.

बोरी वसाहत येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते.(MLA patil statement of Two rotations for irrigation and non irrigation from Bori project jalgaon news )

या वेळी माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल पाटील, उपकार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव एस. पी. चव्हाण, कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव डी. पी. अग्रवाल, सहाय्यक अभियंता एस. जी. पाटील, शाखा अधिकारी पी. जे. काकडे, शाखा अधिकारी अतुल महाजन, कालवा सल्लागार समिती सदस्य यांच्यासह मनोहर पाटील, दिलीप पाटील, अनिल पाटील, रामचंद्र रोकडे, राजाराम पाटील, बाजार समिती माजी संचालक प्रेमानंद पाटील, सुयोग पाटील, कालवा निरीक्षक नाना पाटील, शशिकांत ठाकरे, अतुल पाटील, कमलेश दाभाडे, विकास देवरे, युवराज देवरे, विनोद पाटील, धनराज माळी, पी.एस. पाटील, नंदू पाटील व पाटबंधारे कर्मचारी तसेच लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

या वेळी आमदार पाटील यांनी यावर्षी रब्बी हंगामाकरिता बोरी प्रकल्पातून कालव्याद्वारे सिंचनासाठी एक आवर्तन देण्यात यावे, तसेच बिगर सिंचनासाठी उन्हाळ्यात उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्याचे एक आवर्तन देण्यात यावे, याप्रमाणे बोरी प्रकल्पातून कालव्यातून सिंचनासाठी एक आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी एक आवर्तन असे दोन आवर्तन देण्याच्या सूचना यावेळी आमदार पाटील यांनी केल्या.

या वेळी भोकरबारी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगाम २०२३ -२४ करिता कालव्याद्वारे सिंचनाचे एक आवर्तन देण्याचे ठरविण्यात आले.

सिंचन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

बोरी मध्यम प्रकल्प रब्बी हंगाम २०२३-२४ उन्हाळी बिगर सिंचन कालवाद्वारे पाणी देण्याबाबत आज मान्यवरांच्या उपस्थितीत निर्णय घेऊन बोरी प्रकल्पातून दोन आवर्तन सुटली जाणार आहेत.

MLA Chimanrao Patil while guiding the canal advisory committee meeting. Neighbor officials and government officials.
Jalgaon News : रमाई आवासच्या 1845 घरकुलांना; पालकमंत्र्यांकडून प्रशासकीय मंजुरी

यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज लवकरात लवकर भरून सिंचन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले. निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सिंचन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

बोरी मध्यम प्रकल्प रब्बी हंगाम २०२३-२४ उन्हाळी बिगर सिंचन कालवाद्वारे पाणी देण्याबाबत आज मान्यवरांच्या उपस्थितीत निर्णय घेऊन बोरी प्रकल्पातून दोन आवर्तन सुटली जाणार आहेत.

यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज लवकरात लवकर भरून सिंचन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले. निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही. एम. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

MLA Chimanrao Patil while guiding the canal advisory committee meeting. Neighbor officials and government officials.
Jalgaon News : अमळनेरात हजारो कुणबी नोंदी सापडल्या; जीर्ण कागदपत्रांची पडताळणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com