Jalgaon : पोटच्या मुलाला सोडून आई फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abandoned child

Jalgaon : पोटच्या मुलाला सोडून आई फरार

जळगाव : शहरातील गणेश कॉलनीतील युनिटी चेंबर परिसरात तीन दिवसांपूर्वी एक आई आपल्या सहा वर्षीय मुलास सोडून गेल्याची (Absconding) संतापजनक घटना उघडकीस आली. त्या चिमुकल्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्याची बालसुधारगृहात (juvenile detention center) रवानगी करण्यात आली आहे. (Mother absconds leaving her own child jalgaon crime news)

शहरातील गणेश कॉलनीतील युनिटी चेंबर परिसरात तीन वर्षांचा चिमुकला बेवारसरित्या फिरत होता. तीन दिवसांपासून हा चिमुकला याच ठिकाणी फिरत असून तो रात्री एका झाडाखाली झोपत असल्याचे व्यापारी संकुलातील व्यापारी रावसाहेब पाटील, प्रसाद कासार, विक्की महाले यांच्या लक्षात आले. चिमुकला आजारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या चिमुकल्याला त्या तरुणांनी तत्काळ रुग्णालयात नेवून त्याच्यावर उपचार केले. त्याची विचारपूस केली असता आई आपल्याला याठिकाणी सोडून गेल्याचे तो चिमुकला त्यांना सांगू लागला.

हेही वाचा: वाघूर धरणाच्या लाभ क्षेत्रात 2020 शेततळ्यांची निर्मिती

चिमुकला पोलिसांच्या ताब्यात

चिमुकल्याला त्या तरुणांनी खाऊ पिऊ घातल्यानंतर त्याला सोबत घेऊन त्या तरुणांनी त्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले. याठिकाणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांकडून देखील त्या चिमुकल्याची विचारपूस केली. यावेळी तो चिमुकला त्याचे नाव कृष्णा असे सांगत असून वडीलांचे नाव संतोष तर आईचे नाव कमला असे सांगत आहे. चिमुकल्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याल चिमुकल्याला बालसुधारगृहात दाखल केले आहे. त्या चिमुकल्याच्या कुटुंबांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: जळगाव : स्टेट बॅंकेतून 7 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक

Web Title: Mother Absconds Leaving Her Own Child Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top