Jalgaon News : केंद्राच्या योजनांतून महिलांची आर्थिक उन्नती; खासदार उन्मेष पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Unmesh Patil statement about Economic upliftment of women through schemes jalgaon news

Jalgaon News : केंद्राच्या योजनांतून महिलांची आर्थिक उन्नती; खासदार उन्मेष पाटील

चाळीसगाव (जि. जळगाव) : केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. त्यासाठी भरीव निधीदेखील वितरित करण्यात आला आहे. (MP Unmesh Patil statement about Economic upliftment of women through schemes jalgaon news)

या योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक विकास करण्याची मोठी संधी निर्माण झाली असल्याचे मत खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा महिला अभियानांतर्गत येथील भूषण मंगल कार्यालयात तालुक्यातील महिला व भगिनींसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) म्हणाले, की आत्मनिर्भर महिला अभियानात ७५० प्रकरणांचे उद्दिष्ट असून, आजवर ३०० ते ४०० प्रकरणे पूर्ण झाली असून, येणाऱ्या काळात उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्यातील महिला कशा आत्मनिर्भर होतील, यासाठीच हे अभियान राबविण्यात आले आहे. विविध योजनेतून आज ७५ कोटींच्या निधीचे वाटप शासन व प्रशासन अधिकारी यांच्यात समन्वय साधत करण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष व माजी नगरसेवक घृण्षेश्वर पाटील यांनी विचार व्यक्त केले. तसेच समाधान पाटील, प्रवीण पाटील, विनोद देशपांडे यांनी योजनांची माहिती सांगितली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

कृषी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य धान्य वर्षनिमित्ताने सेल्फी पॉइंटचे उद्घाटन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. आत्मनिर्भर महिला अभियान दरम्यान सुदृढ आरोग्य समृद्ध जीवन अंतर्गत महिलांची मोफत रक्त तपासणी, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्ड नोंदणी अंतर्गत महिला व युती उद्योगांसाठी कर्ज प्राप्ती प्रक्रिया, असंघटित क्षेत्रात कार्य करणाऱ्या १६ ते ५९ वर्षे वयोगटातील श्रमिक भगिनींसाठी ई श्रम कार्ड नोंदणीकरण यासह उमेद अभियाना अंतर्गत विविध वस्तूंचे स्टॉल, शासनाच्या विविध योजनांची माहिती, लघु कर्ज, बचत गटाच्या निर्मितीतून स्वयंरोजगार निर्मिती, शासनाची लेक लाडकी योजना याबाबत माहिती देण्यात आली.

उमंग महिला परिवाराच्या संपदा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले, की उमेद अभियानातून मातृशक्ती आत्मनिर्भर होईल आणि निश्चितपणे समाजात समृद्धीचा जागर होत मातृशक्तीला बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, बाजार समिती माजी सभापती मच्छिंद्र राठोड व सरदार राजपूत, संचालक विश्वजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगल जाधव, भाऊसाहेब जाधव, माजी सभापती संजय पाटील, माजी सभापती स्मितल बोरसे,

उपसभापती सुनील पाटील, दिनेश बोरसे, माजी नगरसेवक बापू अहिरे व चंद्रकांत तायडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष रिजवाना शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रभावती महाजन, जिल्हा व्यवस्थापक हरीश भोई, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे सरपंच सचिन पवार,

गिरीश बऱ्हाटे, युवा मोर्चाचे अक्षय मराठे, व्यापारी आघाडीचे अमित सुराणा आदींसह उमेद अभियान बचत गटाचे प्रमुख व गटप्रवर्तक उपस्थित होते. माजी नगरसेविका तथा आघाडी अध्यक्षा संगीता गवळी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष रेखा पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaonwomen