वीजचोरी करणाऱ्यांना 5 लाखांचा दंड; महावितरणची 18 ग्राहकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB

वीजचोरी करणाऱ्यांना 5 लाखांचा दंड; महावितरणची 18 ग्राहकांवर कारवाई

चाळीसगाव (जि. जळगाव) : विजेच्या छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील एकूण १८ वीज ग्राहकांवर महावितरणने कारवाई करून संबंधिताना पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ग्राहकांनी मुदतीच्या आत भरली नाही तर त्यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी सांगितले.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेची सर्रास चोरी होत असल्याची माहिती येथील महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर तपासणीची मोहीम गुरूवारपासून (ता. २) राबविण्यात आली. खेडगाव (ता. चाळीसगाव) येथे पथकाने जाऊन अचानक तपासणी केली असता, १८ वीज ग्राहकांनी त्यांच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांनी मिळून ३९ हजार १२ युनीट वीज चोरी केल्याने त्यांना ५ लाख ५ हजार ५५४ रुपयांचा दंड ठोठवला. यात मनीषा साळुंखे, भाऊराव साळुंखे, अरुण साळुंखे, नारायण साळुंखे, मनुबाई महाजन, लक्ष्मण वाणी, संभाजी साळुंखे, मेहमुदाबी मणीयार, शांताबाई माळी, केशवराम चंदरसिंग, युनूस मुसा खाटीक, अमीर वाझी मणियार, गंभीर अब्दुल पिंजारी, वामन पाटील, वसंत पाटील, पुंडलिक महाजन, नबाबाई चौधरी, राजेंद्र माळी यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांनी दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा श्री. शेंडगे यांनी दिला.

हेही वाचा: Flipcart च्या कस्टमरला तक्रार भोवली; खात्यावर पडला डाका

या कारवाया मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता श्री. ब्राह्मणकर, सहाय्यक अभियंता श्री. नागदेव, श्री. कदम, श्री. खंदारे यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणीही आकोडे टाकून किंवा वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करू नये अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असे श्री. शेंडगे यांनी कळवले आहे.

हेही वाचा: पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Web Title: Msedcl Action Against 18 Customers And 5 Lakh Fine For Power Theft

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Power SupplyMSEDCL
go to top