मनपा प्रशासनाच्या विरोधात जळगाव शहरातील सातशे मेडीकल बंद 

मनपा प्रशासनाच्या विरोधात जळगाव शहरातील सातशे मेडीकल बंद 
Updated on: 

जळगाव  ः महापालिकेने गाळेधारकांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील औषधी दुकाने आज दुपारी बारापर्यंत बंद होती. यात सुमारे शहरातील सातशे ते आठशे मेडीकल दुकानदारांनी सहभाग नोंदविला. रुग्णांना औषधीसाठी दूपारपर्यंत वाट पहावी लागली. मात्र अर्जंट असलेली औैषधी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली होती. जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनने हा बंद पाळला होता. 

शहरातील १६ मार्केट्स व त्यामधील गाळेधारक आर्थिकरीत्या दुर्बल व मध्यमवर्गीय आहेत. या गाळेधारकांमध्ये ५० ते ६० केमिस्टदेखील आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपजीविका त्या व्यवसायावरच अवलंबून आहे. महापालिकने गाळेधारकांकडे अवाजवी आकारणी केली आहे. एवढी रक्‍कम ते भरू शकत नाही. योग्य रीतसर जी आहे ती ते भरण्यास तयार आहेत. त्यामुळे अन्यायाविरोधात जळगाव शहर मनपा गाळेधारक असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला होता.

मेडीकल का बंद ?

अनेक संकुलात मेडीकल दुकाने देखील असून त्यांना आलेले अवाजवी भाडे ते भरू शकत नाही. महापालिकेने गाळा धारकांवर अन्याय करू नये अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, श्यामकांत वाणी, दिनेश मालू, पंकज पाटील, जयेश महाजन, खलीदभाई शेख, ब्रजेश जैन, इरफान सालार, मनीष अत्तरदे, दीपक चौधरी, रवींद्र वराडे, बाळू सोनवणे, समीर गुळवे तसेच सर्व झोनप्रमुख उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com