चक्क आयुक्तांना मोकाट कुत्र्यांची दिली भेट; कोणी केले असे ? वाचा सविस्तर !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

महापालिकेच्या कामांवर रोष व्यक्त करत भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. शुल्लक कारणे सांगून याबाबत दुर्लक्ष करत असून जर हा प्रश्न लवकर सोडविला नाही

जळगाव : शहरात भटक्या कुत्र्यांनी हौदास मांडला असून कुत्रे चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. याबाबत महापालिका प्रशासनाला तक्रारी करून देखील दुर्लक्ष करत असल्याने संतप्त शिवसेना नगरसेवकाने आज स्थायी समितीची सभा सुरू होण्यापुर्वी आयुक्तांना भटके कुत्रे आणून भेट दिल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली. 
 
जळगाव शहर महानगर पालिकेत सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी तसेच महापालिका प्रशासानाचे ढिम्म कारभाराबाबत विरोधी पक्ष शिवसेना सदस्यांकडून विविध प्रश्नावरूंन कोंडीत आणत आहे. त्यात आज शहरातील मोकाट कुत्रे नागरिकांना चावा घेत असल्याच्या घटना वाढल्या आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या मक्तेदाराच्या कामकाजेची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करून सुध्दा महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने आज संतप्त शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी चक्क मोकाट कुत्रे आणून आणून आयुक्त डॉ. सतिश कुलकर्णी यांना भेट दिले. 

चक्क कुत्रेच दिले भेट
अनेक वेळा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा याबाबत आयुक्तांसह महापालिका प्रशासनाला तक्रार शिवसेना सदस्यांनी केली. परंतू महापालिका प्रशासन यावर दुर्लक्ष करत असल्याने संतप्त शिवसेना सदस्य प्रशांत नाईक यांनी थेट महापालिकेची सकाळी अकरा वाजता सुरू होणारी स्थायी समितीची सभेपूर्वी आयुक्त डॉ कुळकर्णी यांना सभागृहात कुत्रे आणून भेट दिले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित स्थायी सदस्य व मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यासह संपूर्ण सभागृह अवाक झाले. 

तर पून्हा महासभेत आणणार कुत्रे 
शिवसेना सदस्य प्रशांत नाईक यांनी आयुक्तांना कुत्रे भेट देवून महापालिकेच्या कामांवर रोष व्यक्त करत भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. शुल्लक कारणे सांगून याबाबत दुर्लक्ष करत असून जर हा प्रश्न लवकर सोडविला नाही तर शहरातील भटके कुत्रे थेट महासभेत आणणार असा इशारा थेट आयुक्तांना दिला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news jalgaon city wandering dogs meet shivsena member commissioner