आयुक्त साहेब ! अन्यथा तुमच्यावर गुन्हा; शिवसेना नगरसेवकांचा हल्लाबोल

कैलास शिंदे
Wednesday, 13 January 2021

भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी वॉटरग्रेस प्रकरणी प्रश्‍न उपस्थित करून शहरातील साफसफाईबाबत नाराजी व्यक्त केली.

जळगाव : आयुक्त साहेब, सफाई मक्तेदार ‘वॉटरग्रेस’कडे लक्ष द्या, नाहीतर ते प्रशासनाला एक दिवस गोत्यात आणतील, सफाई प्रकरणाची माझ्याकडे पुराव्यासह माहिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मी माहिती दिली तर तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होईल, असा थेट शाब्दिक हल्ला शिवसेना नगरसेवक नितीन बरडे यांनी महापालिका आयुक्तांवर स्थायी समिती सभेत चढविला. 

आवश्य वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !

 

सभेत शहरातील सफाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शहरातील सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीकडे आहे. या कंपनीच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक भागांत सफाईच होत नाही, तर वाहने बंद असल्याने कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

आवर्जून वाचा- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शिरुड गावाची अनोखी शक्कल; जाणून घ्यायचयं, मग वाचा सविस्तर !

याबाबत मंगळवारी महापालिकेच्या महासभेत चर्चा करण्यात आली. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी वॉटरग्रेस प्रकरणी प्रश्‍न उपस्थित करून शहरातील साफसफाईबाबत नाराजी व्यक्त केली, तसेच त्यांनी मक्तेदारांची कचरा गोळा करणारी वाहने बंद असतात, असा आरोपही केला. त्या वेळी शिवसेना नगरसेवक नितीन बरडे यांनी वॉटरग्रेसच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. श्री. बरडे यांच्या आरोपावर आयुक्त म्हणाले, की याबाबत आपण मला माहिती द्यावी, संबंधितावर मी कारवाई करीन, त्यावर बोलताना नितीन बरडे म्हणाले, की संबंधित अधिकाऱ्यांना आपण महिनाभरापूर्वीच माहिती दिली आहे. महापालिका स्थायी समिती सभेत विषयपत्रिकेवरील विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सर्वानुमते विषय मंजूर करण्यात आले.

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news jalgaon shiv sena corporator garbage collection makta

टॉपिकस