
जळगाव ः शहरात अमृत योजने अंतर्गत भूमीगत गटारींचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमीगत गटारींच्या चेंबरचे काम दर्जाहीन असल्याच्या अनेक तक्रारी व गैरसमज नागरिकांच्या मनात होते. त्यानुसार नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी आज पासून चेंबरची लोड टेस्ट सुरू करण्याचे काम महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत उपस्थितीत सुरू झाले. टेस्ट मध्ये चेंबरवर १७ टन वजनाचा भार तपासून पाहण्यात आला.
लोड टेस्टला कानळदा रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, भूमीगत गटारीच्या कामाचे मक्तेदार प्रतिनिधी आणि अभियंता उपस्थित होते
नागरिकांच्या मनात अनेक शंका, संभ्रम
भूमीगत गटारींच्या कामाबाबत जळगावकर नागरिकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम आहे. चेंबरवर पाणी न मारणे, वीट न भिजवता वापरणे, पाणी न मारणे, प्लास्टर न करणे, सिमेंट, वाळू कमी जास्त असणे, चेंबरचे झाकण, रिंग कमकुवत आहे अशा अनेक शंका आणि संभ्रम नागरिकांच्या मनात आहे.
आवश्य वाचा- महिला सदस्यांच्या नशिबी सत्कारही नाही
चेंबरने पेलली १७ टन क्षमता
भूमीगत गटारीसाठी गल्लोगल्ली चेंबर तयार करण्यात आले आहे. गल्लीतून शक्यतो अवजड वाहने जात नाही. तरीही चेंबरने १७ टन क्षमतेचा भार पेलला आहे. १७ टन क्षमता म्हण्जेज चेंबरहून ६८ टन वजनाचे वाहन जाऊ शकते. आजपर्यंत १० चेंबरची तपासणी पूर्ण झाली असून दररोज ५ चेंबर तपासले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.