Jalgaon News : पालिकेचे 263 कोटींचे अंदाजपत्रक सादर; करवाढ टळली!

amalner Municipal building.
amalner Municipal building. esakal

अमळनेर (जि. जळगाव) : नगरपरिषदेने कुठलीही करवाढ न करता २६३ कोटींचे प्रशासक काळातील अंदाजपत्रक (Budget) मंगळवारी (ता. २८) सादर करण्यात आले. (Municipal council presented budget of 263 crore without any tax increase jalgaon news)

पाडळसरे धरणाच्या बॅक वॉटरमधून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली असून, २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. लेखापाल चेतन गडकर यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे २६३ कोटी ९ लाख ७० हजार रुपयांचा अंदाजपत्रक सादर केले.

अमळनेर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणात दरवर्षी प्रचंड प्रमाणात पाणीसाठा राहतो म्हणून तेथे नवीन यंत्रणा उभारून धार टेकडीवर नवीन पाण्याची टाकी उभारून पंपिंग स्टेशन करण्यात येणार आहे. या योजनेसाठी ८० कोटींची तरतूद आहे. यामुळे कायमची पाणी समस्या मिटणार आहे.

यावर्षी तृणधान्य वर्ष २०२३ जाहीर झाल्याने १० लाख रुपयांची तरतूद बालवाडी, अंगणवाडी मुलांना पोषक आहार व जनजागृती करण्यात आली आहे. तसेच सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण जीआय पद्धतीने करण्यात येणार आहे. घरांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. मात्र, त्याबाबतची कर आकारणी पुढील वर्षी करण्यात येईल.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

amalner Municipal building.
Skilled India Mission : मुलांच्या भाषाज्ञानात वृद्धी, संख्यात्मक कौशल्यात वाढ!

दुर्बल घटक कल्याण निधी ९० लाख, अपंग कल्याण निधी १५ लाख, महिला बालकल्याण विकास १५ लाख रुपये कल्याणकारी योजनांवर विशेष तरतूद करण्यात आली आहे. भुयारी गटारसाठी ३० कोटीचा वाढीव प्रस्ताव करण्यात आला आहे. नगरोथान योजनेत १० कोटी रस्त्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे.

यात नदीला समांतर रस्ता गांधलीपुरा भागातून तांबेपुरा, सानेनगरकडे भुयारी मार्गासह नेण्यात येणार आहे. तर अमृत सरोवर व अमृत उद्यान ताडे नालासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रक बैठकीसाठी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, बांधकाम अभियंता अमोल भामरे, दिगंबर वाघ, संदीप पाटील, पाणीपुरवठा अभियंता सत्येम पाटील, युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, डॉ. विलास महाजन, संजय चौधरी हजर होते.

"शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अंदाजपत्रकात उपाययोजना करण्यावर भर दिला असून, नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना पालिकेचा स्वतःचा उत्पन्न स्त्रोत असणे महत्त्वाचे आहे. यासाठी पालिका उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार आहे." - प्रशांत सरोदे मुख्याधिकारी, अमळनेर पालिका

amalner Municipal building.
Jalgaon News : ‘नाफेड’अंतर्गत हरभरा खरेदीला सुरवात; 17 केंद्रांवर नोंदणीचे पणनचे आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com