Murder News | चारित्र्याच्या संशयावरून पतीच्या डोक्यात दगड घालून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

चारित्र्याच्या संशयावरून पतीच्या डोक्यात दगड घालून खून

चाळीसगाव : चारित्र्याच्या संशयावरून मद्यपीने पतीच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना शनिवारी (ता. २६) रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान शहरातील बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात घडली. या प्रकरणी मारेकरी पतीला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी सांगितले, की येथील बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात राहणाऱ्या प्रकाश ऊर्फ भुरा सोनवणे (वय ४०, रा. मुखेड, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) हा पत्नी मायाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यारून पती-पत्नीत शनिवारी (ता. २६) रात्री अकरा ते बाराच्या सुमारास वाद झाला. या वादात प्रकाश ऊर्फ भुरा याने पत्नी मायाबाईच्या डोक्यात दगड टाकला.

गंभीर जखमी झालेल्या मायाबाईला तातडीने दवाखान्यात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसांत भारताबाई विक्रम गायकवाड (भिल, ६०, धंदा- मजुरी, रा. खाजोळा, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश ऊर्फ भुरा रामदास सोनवणे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी मारेकरी पतीला लगेचच ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी व सागर ढिकले, हवालदार पंकज पाटील, विनोद भोई, राहुल सोनवणे, भगवान उमाळे तपास करीत आहेत.

Web Title: Murder News Doubt On Wife Character Stoning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :murdermurder case