
भुसावळ : महायुतीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना लाडक्या बहिणींचा आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र, यासोबतच महिलांचे संघटन तयार करणाऱ्या संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचाही विजयात मोठा वाटा आहे. श्री. सावकारे यांच्या लाडक्या बायकोची कामगिरी दुर्लक्षून चालणार नाही. श्री. सावकारे यांच्याप्रमाणेच त्यांचा स्वभाव शांत व संयमी आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे मोठ्या विनम्रतेने स्वागत करतात.