Latest Marathi News | ‘आनंद शिधा’ ची रक्कम नागरिकांना परत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anandacha Shidha news

Nationalist Congress Party Statement : ‘आनंद शिधा’ ची रक्कम नागरिकांना परत करा

जळगाव : राज्यात सत्तेत आलेल्या सरकारने दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना शंभर रुपयांत चार वस्तूंचा ‘आनंद शिधा’ देण्याची योजना जाहीर केली, मात्र ती फसवी ठरली असून, त्यातून काही वस्तू गायब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या शंभर रुपयांतून उर्वरित रक्कम परत करावी, अशी मागणी महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की ही योजना जाहीर करताना सरकारने नागरिकांचा विचार न करता नागपुरी पंटरांना लाभ पोचविण्यासाठी ती राबविली.(Nationalist Congress Party Statement Return amount of Anand Shidha to citizens Jalgaon News)

हेही वाचा: Crime Update : तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

या योजनेद्वारे सामान्य नागरिकांना शंभर रुपयांत रवा, पामतेल, साखर व हरभराडाळ अशा चार वस्तू मिळणार होत्या. मात्र, दिवाळी उलटून गेल्यानंतरही बऱ्याच ठिकाणी हा शिधा पोचलाच नाही.

ज्या ठिकाणी पोचला त्या ठिकाणी कुठे साखर, तर कुठे डाळ, तर कुठे अन्य वस्तू नव्हती. नागरिकांकडून मात्र सरकारने या शिध्यापोटी शंभर रुपये वसूल केले. त्यामुळे जी वस्तू नव्हती, तिची रक्कम नागरिकांना परत करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, सुनील माळी, रिंकू चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Neha Malik : नेहा तिच्या बोल्डनेसनं वाढवतेय दुबईचं तापमान