लोकसेवेत व्यस्त राहिलात तर सत्तेतही टिकून राहता येते !

jayant patil
jayant patil

पाचोरा: अपयश आणि पराभव यासंदर्भात आत्मचिंतन व्हावेच; परंतु त्यातच अडकून पडण्यापेक्षा विचार आणि अपेक्षांचा वेग वाढवणे महत्त्वाचे असते. स्वतःमध्ये बदल घडवून आणला, प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश आपल्यापासून लांब राहूच शकत नाही. धनापेक्षा जनतेशी असलेल्या संपर्काचा परिणाम जास्त प्रभावी ठरतो. काहीही अशक्य नसते; पण ते मिळवण्यासाठी गतिमान प्रयत्न महत्त्वाचे असतात. हुल्लडबाजीने यश मिळत नाही. आपल्या यशाचा पाया पक्षाच्या बूथ कमिटीवर आधारित असतो. लोकसेवेची व्यस्तता माणसाला सत्तेत टिकवून ठेवते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाचोरा येथे केले.

 पाचोरा येथे मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी परिवार यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. महादेवाचे बांबरुड गावापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य बाइक रॅली काढून नेत्यांचे जल्लोषात स्वागत केले. एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मंत्रिमहोदयांनी संवाद साधला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार डॉ. सतीश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, मनीष जैन, पीटीसी चेअरमन तथा पालिका गटनेते संजय वाघ, संजय गरुड, गुलाबराव देवकर, डॉ. संजीव पाटील, ललित वाघ, योगेश देसले, विजय पाटील, सतीश चौधरी, मेहबूब शेख, ललित बागूल, संजय गरुड, योगेश देसले, मेहबूब शेख, रविकांत वर्से, सुनील गवांदे, सूरज चव्हाण, सुनील गवारे, नितीन तावडे, भूषण वाघ, योगेश देसले, शेख रसुल, विजय महाजन आदी उपस्थित होते. 
याप्रसंगी पाचोरा व भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध विभागांच्या कार्यकारिणीचा व उपस्थितीचा आढावा घेण्यात आला. सर्व विभागाच्या कार्यकारिणी अद्यायावत करण्याचे सूचित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजीव पाटील यांची नियुक्ती झाली. नितीन तावडे यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रणजित पाटील यांनी आभार मानले. 

महाविकास आघाडीत लवकरच 
मेगाभरती : एकनाथ खडसे 

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत सत्तेची मस्ती, माज आणि अहंकार माणसाला सत्तेपासून दूर करतो. महाविकास आघाडीचे सरकार पडेल याची वाट पाहणारे आणि मी पुन्हा येणार अशा वल्गना करणारे आता कधीच येणार नाहीत, असे सांगून शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ यासंदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागा, पक्षात लवकरच मेगा भरती होईल, मी तुमच्यासोबतच आहे, असा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com