राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मंत्री पाटील यांनी घेतली हजेरी 

देविदास वाणी
Monday, 15 February 2021

आपल्या वॉर्डातील नगरसेवक कोणत्या पक्षाचे, त्यांचे नाव काय या पद्धतीने जयंत पाटील यांच्याकडून प्रश्‍नांची विचारणा करण्यात आली.

जळगाव ः राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासाठी काय केले ते सांगा किंवा मांडा, पक्ष संघटन वाढीसाठी कोणकोणते कार्यक्रम घेतले, किती लोकांची कार्यकारिणी अन् सभागृहात किती कार्यकर्ते उपस्थित आहेत, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जळगाव महानगर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. 

आवर्जून वाचा- *Video पार्थ पवारची कमाल..स्‍वतःचीच कल्‍पना अन्‌ क्रिया; साकारला घरात फिरणारा आणि काम करणारा रोबो
 

खानदेशातील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा छत्रपती संभाजी नाट्यगृहात समारोप शनिवारी  झाला. या वेळी मंत्री पाटील यांनी जळगाव महानगरध्यक्ष कार्यकारिणीसह कामाचा आढावा घेतला. महानगराध्यक्षांपासून युवक, युवती, अध्यक्ष अशी प्रत्येकांची या वेळी जयंत पाटील यांनी हजेरी घेतली.

 

महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यापासून सुरवात झाली. यानंतर महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, ग्रामीण युवक अध्यक्ष यांना प्रत्येकाला व्यासपीठावर बोलावून पक्षात कधी आले, किती लोकांची कार्यकारिणी आहे, काय उपक्रम घेतले, शहरात वॉर्ड किती, बूथ किती, आपल्या वॉर्डातील नगरसेवक कोणत्या पक्षाचे, त्यांचे नाव काय या पद्धतीने जयंत पाटील यांच्याकडून प्रश्‍नांची विचारणा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार कार्यकारिणीपैकी किती जण सभागृहात उपस्थित आहेत, याची खात्रीही उपस्थित प्रत्येकाला हातवर करायला लावत मंत्री पाटील यांनी केली. 

आवर्जून वाचा- जळगाव जिल्ह्यात माता-शिशूंसाठी हॉस्पिटल; तंत्रज्ञान उपकेंद्रही होणार  ​

...अन् स्वागतासाठी सर्वांचीच गर्दी 
महानगराध्यक्षांपासून इतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यकारिणीची संख्या सांगितली. यात महानगराध्यक्षांची ४३ जणांची कार्यकारिणी असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी १९ जणच सभागृहात हजर असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे इतरांनीही सांगितल्यापेक्षा कमीच कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसून आले. युवती शहराध्यक्ष यांचेच सभागृहात पूर्णच्या पूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती. इतरांच्या कार्यकारिणीतील अनेकांची हजेरी नव्हती. मात्र जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp marathi news jalgaon minister jayant patil scolded office bearers