
‘ईडी’ला बिडीएवढीही किंमत नाही : धनंजय मुंडे
अमळनेर : ‘‘सध्या राज्याचे सामाजिक सौख्य बिघडवून अशांतता निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. ‘ईडी’चा वापर करून थकले म्हणून आताच यांना भोंगा आठवला. मात्र, याच ‘ईडी’ला सध्या बिडी एवढीही किंमत उरलेली नाही,’’ असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. इंधवे (ता. पारोळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील शांतता व सलोखा बिघडविण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करीत असल्याचे मुंडे म्हणाले. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकजूट व्हा, तुमची कामे करण्यासाठीच आम्ही मुंबईला बसलेलो आहोत, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे राजकीय ओबीसी आरक्षणापासून आज वंचित राहावे लागत असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला.
Web Title: Ncp Minister Dhananjay Munde On Ed Amalner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..