Gold Silver Rate : सोने, चांदीला झळाळी कायम; मागणीत वाढ

Gold silver rate hike
Gold silver rate hikeesakal

जळगाव : सोन्यातील गुंतवणूक ही लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदी मोड दिली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. त्यामुळे सोन्यात दर वर्षी गुंतवणूक वाढत आहे. (new year bullish atmosphere in market gold silver demand hike from past 8 days jalgaon news)

गेल्या आठ दिवसांपासून सोने, चांदीला झळाळी कायम असली तरी सोने, चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे चित्र सोने बाजारात आहे. पंधरवड्यात सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात एक हजारांची घसरण झाली आहे.

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर जीएसटीसह ५८ हजार ८०० वर पोचला होता, तर चांदीचा दर जीएसटीसह ७२ हजार १०० वर पोचला होता.

गेल्या आठ दिवसांपासून सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५९ हजार १२२, तर चांदीचा दर ७१ हजारांपर्यंत खाली आला.

ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो, तो गुंतवणूक म्हणून. शहरी भागातील महिलाही गुंतवणूक अधिक फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात. भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी १,१०० ते १,२०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो.

Gold silver rate hike
Success Story : जमीनदोस्त केळीला विक्रमी भाव! तांदलवाडी येथील महाजन कुटुंबाची किमया

गत वर्षी १२ एप्रिल २०२२ चांदीचा दर ७० हजार प्रतिकिलोवर गेला. नंतर ६९ हजारांवर आला. जुलैमध्ये सोने ६१ हजारांपर्यंत पोचला. १ सप्टेंबरला चांदी ५४ हजारांपर्यंत खाली आली. नंतर सोने, चांदीच्या दरात वाढ होत गेली ती दिवाळीपर्यंत. दिवाळीला सोने ४९ हजार ९०० प्रतितोळे, तर चांदी ५६ हजार ५०० प्रतिकिलो होते.

गेल्या पंधरवड्यातील सोने, चांदीचे दर असे (विनाजीएसटी)

तारीख -- सोने प्रतितोळे -- चांदी प्रतिकिलो

१४ जानेवारी -- ५६ हजार ६०० -- ६९ हजार ५००

१६ जानेवारी -- ५६ हजार ८०० -- ७० हजार

२१ जानेवारी -- ५७ हजार -- ६९ हजार

२६ जानेवारी -- ५७ हजार ६०० -- ६९ हजार

२८ जानेवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

Gold silver rate hike
Jalgaon News : चाळीसगाव भडगाव तालुक्यासाठी वरदान; वरखेडे- लोंढे मध्यम प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com