कुरुकवाडे ग्रामपंचायतीत १९ लाखांचा भ्रष्टाचार

माजी सरपंचांसह दोन ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल
corruption
corruption sakal

निमगूळ - कुरकवाडे (ता. शिंदखेडा) येथील ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने काम दाखवून काम केले नाही. बिल अदा करून हजेरीपट समितीस रेकॉर्ड न दाखविल्याने फक्त कॅशबुकमध्ये कामावर खर्च दाखविल्याने मोजमाप पुस्तक काम पूर्णत्वाचा दाखला व रेकॉर्ड नसल्याने १९ लाखाचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. श्यामकांत यादवराव पाटील यांचा तक्रारी उपोषणाचा अर्ज व निवृत्त गटविकास अधिकारी शिवदे यांनी नेमलेल्या त्रिसदस्य चौकशी समितीच्या अहवालानुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात माजी सरपंचासह दोन ग्रामसेवकावर विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी बुधवारी (ता.२०) दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष सावकारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामसेवक संजय असरू कंकराल, तत्कालीन सरपंच मीनाबाई दुल्लभ सोनवणे व ग्रामसेवक मांगूलाल शंकर मराठे (रा. शिरपूर) यांनी पंचायत समिती मार्फत देण्यात आलेली ग्रामपंचायतची विविध विकास कामांचे अंदाजपत्रके काम पूर्णत्वाचे दाखले, खर्चाचे प्रमाणके, केलेल्या कामाचे मोजमाप पुस्तिका चौकशी समितीस दाखवले नाही. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने केलेले कामे नियमबाह्य केले असून १३ व १४ वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठा दुरुस्त करणे दोन लाख २५ हजार ४०० रस्ता दुरुस्ती ६० हजार, स्वच्छतागृह दुरुस्ती दहा हजार, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, गटार दुरुस्ती आरोग्य दुरुस्ती, एलईडी लाइट बसवणे, आरो फिल्टर बसवणे, पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्ती, फेवर ब्लॉक बसविणे, पाइपलाइन दुरुस्ती, संगणक ऑपरेटर मानधन, अमरधाम बांधकाम खर्च करण्यात आला आहे. सदर खर्च २०१५ ते २०१८ या वर्षात केले असून ती रक्कम १८ लाख ९८ हजार ९३० रुपये आहे. ग्रामसेवक संजय कंकाळ एक लाख ९३ हजार ७००, सरपंच श्रीमती सोनवणे यांनी १३ व १४ व्या वित्त आयोगातून नऊ लाख ४९ हजार ४६५, तत्कालीन ग्रामसेवक मांगुलाल शंकर मराठे यांनी १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत सात लाख ५५ हजार ७६५ रुपयांचा अपहार केलेला आहे. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन गायकवाड तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com