Jalgaon : दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करा

जिल्हा प्रशासन : जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर\
diwali 2021
diwali 2021sakal media
Updated on

जळगाव : नागरिकांनी फटाके फोडण्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.दिवाळीसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

ही आहे खबरदारी

दिवाळीदरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होते. नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेषकरून ज्येष्ठ नागरिक, तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडणे टाळावे. मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.

आरोग्यविषयक उपक्रम राबवा

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदाहरणार्थ रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगी इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणीदेखील लोकांनी एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com