

जळगाव - देशभरातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा विडा उचलला असून, येत्या २९ जुलैला गृहमंत्री अमित शहा देशभरातील सायबर गुन्ह्यांचा आढावा घेणार आहेत. राज्य व जिल्हानिहाय उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार असल्याचे सांगण्यात येते. नक्षलवाद संपविण्यासाठी ‘सीआयएसफ-बीएसएफ’ने राबविलेल्या मिशनप्रमाणे आता सायबर आर्मी मिशन प्रगती अंतर्गत देशवासीयांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे.