Jalgaon News : शिवभोजन केंद्रात अरेरावी, अस्वच्छता; 30 शिवभोजन चालकांना नोटीस

Notice to 30 Shivbhojan drivers due to uncleanliness jalgaon news
Notice to 30 Shivbhojan drivers due to uncleanliness jalgaon news

Jalgaon News : शहरातील शिवभोजन केंद्रात भोजन देताना अस्वच्छता असणे, सीसीटीव्ही नसणे, अन्न शिजविण्यासाठी किचनची व्यवस्था नसणे, लाभार्थ्यांशी अरेरावी आदी कारणांमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी शिवभोजन चालकांना कारणे दाखवासह केंद्र का रद्द करू नये अशा आशयाच्या नोटीस दिल्या आहेत.

मेहरूण परिसर, जिल्हा रुग्णालय, रेल्वे मालधक्का, गोलाणी मार्केटसह विविध ठिकाणी असलेल्या शिवभोजन केंद्रांत अन्न शिजविण्यासाठी किचन नसणे, केंद्रात अस्वच्छता असणे, लाभार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नसणे आदी तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. (Notice to 30 Shivbhojan drivers due to uncleanliness jalgaon news)

त्यानूसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पथकांची नियूक्ती करून केंद्र तपासणीचे आदेश दिले. त्यात अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. यामुळे संबंधित तीस केंद्र चालकांना १७ ते १९ आक्टोबरदरम्यान उत्तर देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे बोलाविण्यात आले आहे.

अशा आहेत शिवभोजन केंद्रातील त्रुटी

* एकावेळेस २५ जणांची बसण्याची व्यवस्था नाही

* स्वतंत्र किचनची व्यवस्था नाही

* लाभार्थ्यांशी अरेरावीची भाषा

* केंद्र वेळेत सुरू होत नाही

* अनेक ठिकाणी अस्वच्छता

* अन्न पदार्थ तयार करण्यासाठी स्टीलच्या भांड्यांचा वापर

Notice to 30 Shivbhojan drivers due to uncleanliness jalgaon news
Anandacha Shidha : आनंदाची बातमी! 2 वेळा मिळणार ‘आनंदाचा शिधा’; अगोदर येईल त्यालाच लाभ

* शिवभोजन केंद्र नावाचा बोर्ड नसणे

* लाभार्थ्यांना शिवभोजन केंद्रावरुन पार्सल देणे

* सीसीटीव्ही कार्यान्वित नसणे

* पूर्व कल्पना न देता शिवभोजन केंद्र बंद ठेवणे

* भोजन बनविण्याची क्रिया, खाद्यपदार्थाची साठवणूक, अन्न पदार्थाचे वितरण कार्यप्रणालीसाठी एसओपी नसणे

* पिण्यासाठी फिल्टर्ड पाणी नसणे

* हात धुण्यासाठी वॉश बेसिनची व्यवस्था नसणे

Notice to 30 Shivbhojan drivers due to uncleanliness jalgaon news
Gharkul Scam News : दोषी 48 माजी नगरसेवकांकडून वसुली करावी; मनपा लेखा परिक्षक विभागाचे बांधकाम विभागास पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com