Jalgaon News : भुसावळमधील गाळेधारकांना बजावणार नोटीस; नवीन दरनिश्चितीसाठी प्रस्ताव

Notice to be issued to shop owners in Bhusawal
Notice to be issued to shop owners in Bhusawalesakal

Jalgaon News : पालिकेच्या मालकीचे शरातील ३० व्यापारी संकुलांतील तब्बल १ हजार ४३७ गाळ्यांची मुदत संपली आहे. या गाळ्यांच्या नवीन दरनिश्चितीसाठी आता पालिका प्रशासनाने नगररचना सहाय्यक संचालकांकडे प्रस्ताव देण्याची तयारी सुरू केली आहे.

सध्या पालिकेच्या गाळ्यांच्या भाड्यातून दरवर्षी सरासरी २५ लाख रुपये उत्पन्न मिळते. (Notice to be issued to shop owners in Bhusawal jalgaon news)

रेडिरेकनर दरनिश्चिती झाली तर किमान वार्षिक उत्पन्न २२ पटीने वाढून साडेपाच कोटींवर पोचणार आहे. दरनिश्चिती नंतर मुदत संपलेल्या गाळेधारकांना दुकाने रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्यात येणार आहेत.

यानंतर स्थायी निर्देश २४ नुसार गाळेधारकांना लिलाव किंवा निविदा पद्धतीचा वापर करून गाळे वितरण होईल. जळगाव महापालिकेने मुदत संपलेल्या गाळ्यांचे दरनिश्चिती करण्यापूर्वीच मुदत संपलेल्या गाळेधारकांना गाळे रिकामे करण्याची नोटीस बजावली होती.

भुसावळ पालिकेने मात्र या चुकीची शिकवण घेत प्रथम सहाय्यक संचालकांकडून गाळ्यांची क्षेत्रफळानुसार दरनिश्चिती करुन यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले आहे. शासकीय नियमांनुसार ही सर्व प्रक्रिया पार पडली तर पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. तर दुसरीकडे गाळेधारकांनाही आपली मुदत संपलेले दुकाने रिकामे करावे लागतील.

Notice to be issued to shop owners in Bhusawal
Jalgaon News : प्रभाग कर्मचारी 1 भाग एकाचवेळी करणार स्वच्छ; आरोग्य निरीक्षकांना आदेश

पालिकेची शहरात ३० संकुले

बाबा तुलसीदास उदासी मार्केट, संतोष चौधरी म्युनिसिपल मार्केट, शहीद अब्दुल हमीद मार्केट, स्व. छबीलदास चौधरी संकुल, शाहीर अण्णाभाऊ साठे मार्केट, डेली मार्केट, नगरपालिका शाळा पाचजवळील म्युनिसिपल मार्केट, गोपाळनगर मार्केट, संत रोहिदास महाराज मार्केट, संत जगनाडे महाराज मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, द. शि. महाविद्यालयाजवळील महात्मा गांधी मार्केट, नारायण पाटील मार्केट, टेक्निकल हायस्कूलसमोरील वल्लभभाई पटेल मार्केट आदींसह अन्य ३० व्यापारी संकुले शहरात आहेत. यातील सर्वच गाळ्यांची मुदत संपून ८ ते १० वर्षांचा काळ लोटला गेला आहे. मात्र जुन्या दरांप्रमाणेच भाडेवसुली होत आहे.

अशी होणार पुढील प्रक्रिया

पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यातच शहरातील पालिकेच्या सर्व व्यापारी संकुलातील गाळ्यांचे क्षेत्रफळाची मोजणी केली आहे. प्रत्येक दुकानाचे क्षेत्रफळ, वर्णन आदींचा डेटा पालिकेने तयार केला असून, या गाळ्यांच्या दरनिश्चितीचा प्रस्ताव सहाय्यक संचालक नगररचना विभागाकडे दिला जाणार आहे.

या जागेचे रेडिरेकनर मूल्य काढून त्या मूल्याच्या आठ टक्के दराने वार्षिक भाडेपट्टा आकारणी होणार आहे. या दरांना त्रिसदस्यीने समितीने मंजुरी दिल्यानंतर मुदत संपलेल्या गाळेधारकांना आपली दुकाने रिकामी करण्याची नोटीस बजावली जाईल.

Notice to be issued to shop owners in Bhusawal
Jalgaon News : जर्मन तंत्रज्ञानाने रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; 85 कोटींच्या निधीतील कामे

स्थायी निर्देश २४ चा अडसर

शहरातील व्यापारी संकुलांतील गाळे नऊ वर्षांच्या कराराने देण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानंतर शासनाने दिलेल्या स्थायी निर्देश २४ नुसार दुकानांचे लिलाव किंवा निविदा पद्धतीने वितरण होणे अपेक्षित आहे. शहरात मात्र गेल्या १० ते १३ वर्षांत ही प्रक्रिया झाली नाही.

स्थायी निर्देश २४ नुसार अंमलबजावणी ही सध्या वापर असलेल्या गाळेधारकांसाठी सोयीची नाही. लिलाव व निविदा प्रक्रियेत सध्याचा गाळा त्यांनाच मिळेल? याबाबत शाश्वती नाही. मात्र पालिकेला नियमांनुसार उत्पन्नवाढ व मुदत संपलेल्या गाळ्यांचे वितरण करावेच लागेल.

''पालिकेच्या मुदत संपलेल्या गाळ्यांचे दरनिश्चितीसाठीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव सहाय्यक संचालक नगररचना विभाग यांना मंजुरीसाठी पाठविला जाईल. रेडिरेकनर दरानुसार दरनिश्चिती होईल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. यानंतरच्या काळात दुकानदारांना नोटीस दिल्या जातील. सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने केली जात आहे.''- जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी तथा प्रशासक, भुसावळ नगरपालिका.

Notice to be issued to shop owners in Bhusawal
Jalgaon News: दीपस्तंभच्या ‘मनोबल’ला सर्वोच्च संस्था राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com