जळगाव : दोन दिवसांतच बाधितांची संख्या दुप्पट

जिल्ह्यात दिवसभरात ३९ नवे रुग्ण; सक्रिय रुग्ण शंभरीकडे
corona
corona sakal

जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल दोन दिवसांपूर्वीच लागली. गेल्या चार- पाच दिवसांतील नव्या रुग्णांची संख्या बघता आता दोनच दिवसांत रुग्ण दुप्पट होताना दिसतायं. बुधवारी (ता. ५) जिल्ह्यात तब्बल ३९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा एकदा शंभरीकडे वाटचाल करतेय. जळगाव जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत आटोक्यात असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढू लागली आहे. जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. सोमवारी १६, मंगळवारी १३ नवे रुग्ण समोर आल्यानंतर बुधवारी दिवसभरातील नव्या रुग्णांचा आकडा तब्बल तिपटीने वाढून तो ३९वर पोचला आहे. (corona patient in jalgaon)

जळगाव, भुसावळात चिंता

जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरासह भुसावळ हे या तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक प्रभावित ठरत आहेत. बुधवारच्या नव्या ३९ रुग्णांमध्ये जळगाव शहरातील तब्बल १७, तर भुसावळ तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे. जळगावात आता सक्रिय रुग्णसंख्या ३५ झाली असून, भुसावळात ते २३ वर आहेत. बुधवारी एरंडोल येथे ४, चाळीसगाव तालुक्यात ५ रुग्णांची नोंद झाली.

चाचण्याही वाढल्या

अर्थात, तिसऱ्या लाटेच्या पाश्‍र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने चाचण्याही वाढविल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून दैनंदिन चाचण्यांची संख्या हजार, पंधराशेवर पोचली. बुधवारी तब्बल २८०४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ३९ रुग्ण समोर आले आहेत.(Jalgaon news)

गंभीर रुग्ण अल्प

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९१ वर पोचली असली, तरी त्यात लक्षणे असलेले रुग्ण केवळ १२ आहेत. पैकी दोघेच ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. सध्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट दोन टक्क्यांच्या जवळपास आहे.

असे आढळले रुग्ण

  • दिवस चाचण्या रुग्ण

  • १ जानेवारी २२७० ६

  • २ जानेवारी १८६५ ५

  • ३ जानेवारी ९७१ १६

  • ४ जानेवारी १४६४ १३

  • ५ जानेवारी २८०४ ३९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com