
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या 50 पार
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आठवडाभरापासून वाढत असून नव्याने १७ रुग्णांची शुक्रवारी (ता. २४) भर पडली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता पन्नासवर पोचली आहे. आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सतर्कता म्हणून यंत्रणेने चाचण्याही वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येते.
शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात अडीचशेवर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १७ नवे बाधित आढळून आले. यात जळगाव शहरात ६, भुसावळ ६, यावल तालुक्यात ५ रुग्ण समोर आले. दिवसभरात एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. नव्याने १७ रुग्णांची भर पडल्याने सक्रिय रुग्णसंख्या ५२ झाली आहे. असे असले तरी यापैकी एकही रुग्ण गंभीर नाही. लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ४७ असून ५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.
हेही वाचा: जळगाव : नव्याने तयार झालेल्या महामार्गावर तडे बुजविण्याचा टाइमपास
हेही वाचा: भारतात नव्या कोरोना रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ; 24 तासांत 17,336 प्रकरणं समोर
Web Title: Number Of Corona Patients In Jalgaon District Has Crossed 50
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..