
Cleanliness Drive : धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 200 टन कचरा संकलीत; जिल्हाभरात स्वच्छता अभियान
जळगाव : येथील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी (ता. १) श्री धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगाव शहरासह जिल्ह्यातील धरणगाव, जामनेर, एरंडोल येथे स्वच्छता अभियान (Cleanliness Campaign) राबविण्यात आले. (occasion of birth centenary of Nanasaheb Dharmadhikari cleanliness campaign was conducted jalgaon news)
या अभियानात तीन हजार ६१९ ‘श्री’ सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. त्यात २००.१० टन कचरा संकलीत करून राष्ट्रीय कामात आपले योगदान दिले. जळगाव शहरात १०३.५ टन कचरा संकलीत झाला. स्वच्छता अभियानात एक हजार ९८७ हजार ‘श्री’ सदस्यांनी सहभाग नोंदविला. एकूण ट्रॅक्टर २५ व १५ ‘श्री’ सदस्यांची वाहने होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या अभियानाची सुरवात महापौर जयश्री महाजन, भरत शंकर सपकाळे, भगत बालाणी, मनोज चौधरी, प्रतिभा सुधीर पाटील, विजय पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील,
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

स्वच्छता करताना स्वयंसेवक आणि दुसऱ्या छायाचित्रात, स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या महापौर जयश्री महाजन आदी.
महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, आरोग्य उपायुक्त उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवून केली. नगरसेवक प्रवीण कोल्हे, इब्राहिम मुसा पटेल, नवनाथ दारकुंडे आदी समाजसेवकांनी प्रामुख्याने यात सहभाग घेतला.
जळगावातील शासकीय इमारती व सिंधी कॉलनी, शेरा चौका ते लढ्ढा फॉर्मसमोरील रस्त्यासह पूर्ण परिसर, कालिंकामाता मंदिर ते नेरीनाका, महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट व मुख्य बाजारपेठेचा परिसर चकाचक करण्यात आला.