Jalgaon - दोन मजली इमारत कोसळली; पहाटेची दुर्घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावमध्ये दोन मजली इमारत कोसळली

जळगावमध्ये शनिपेठ परिसरात महापालिकेच्या शाळेजवळ असलेली जुनी दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली.

जळगावमध्ये दोन मजली इमारत कोसळली

जळगाव - शहरातील शनिपेठ परिसरात महापालिकेच्या शाळेजवळ असलेली जुनी दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. पहाटे चार वाजता इमारत कोसळली असून यात ११ जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिपेठ परिसरात महापालिकेची १७ क्रमांकाची शाळे आहे. त्याच्या समोर असलेली जुनी इमारत पहाटे कोसळली.

इमारत कोसळली तेव्हा मोठा आवाज झाला. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच गोंधळ उडाला होता. इमारत कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

loading image
go to top