Jalgaon News : पाचोऱ्यात रंगली कुस्त्यांची दंगल; राज्यभरातील पहिलवानांचा सहभाग
esakal

Jalgaon News : पाचोऱ्यात रंगली कुस्त्यांची दंगल; राज्यभरातील पहिलवानांचा सहभाग

Published on

पाचोरा : येथील महावीर व्यायामशाळेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त श्रीराम मंदिराच्या आखाड्यात आयोजित कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. राज्यभरातील कुस्तीपटूंनी या दंगलीस हजेरी लावल्याने मोठ्या जोड लावण्यात आल्या. (On occasion of Shiv Jayanti wrestling match organized by Mahavir Gymnasium in the arena of Shri Ram Temple jalgaon news)

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीराम मंदिरापर्यंत कुस्तीपटूंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आखाड्याजवळ नीळकंठ महाराज, अण्णा महाराज यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमान चालिसा पठण व पूजन करण्यात आले.

नगरसेवक सतीश चेडे यांच्या हस्ते आखाडा पूजन करून कुस्त्यांच्या दंगलीस प्रारंभ झाला. यासाठी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय वाघ, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, संदीप पाटील, सतीश चेडे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे सहकार्य लाभले. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष प्रा. मालोजीराव भोसले,

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Jalgaon News : पाचोऱ्यात रंगली कुस्त्यांची दंगल; राज्यभरातील पहिलवानांचा सहभाग
Jalgaon News : ...तर शिल्लक निधी पालिकांकडे वळवणार; जिल्हाधिकारी मित्तल

कैलास आमले, सुनील पाटील, गोकुळ पाटील, बबन पाटील, संजय गोसावी, सुधीर पाटील, गजानन जोशी, दिनेश पाटील, प्रा. सी. एन. चौधरी, अनिल येवले, वैभव पाटील, गंपा पहिलवान, संदीप मराठे, मयूर शेलार, जगदीश शेलार, नारायण जगताप आदींची उपस्थिती होती. भाजपाचे अमोल शिंदे ,उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वैशाली सूर्यवंशी,

गौरव वाघ, भरत महाराज आदींनी भेट देऊन कुस्तीपटूंचा सत्कार केला. पंच म्हणून कैलास आमले, गोकुळ पाटील, सुनील पाटील, जमील बागवान, राजेंद्र पाटील, तात्या नागणे, दिनेश पाटील यांनी काम पाहिले. प्रा. राकेश सोनवणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचलन केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

Jalgaon News : पाचोऱ्यात रंगली कुस्त्यांची दंगल; राज्यभरातील पहिलवानांचा सहभाग
Cotton Crop Damage : कापसाला नाही भाव, कीटकांचा प्रादुर्भाव; साठवलेल्या कापसामुळे खाजेचे विकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com