

Jalgaon
esakal
पाचोरा: गिरड (ता. भडगाव) येथील २५ वर्षीय रवींद्र मोरे या कापड व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असता, शुक्रवारी (ता. २९) या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी संशयित तरुणीसह लॉजमालक व वेटर या तिघांविरुद्ध गुन्हे नोंदवून तरुणी व लॉजचालकास ताब्यात घेतले आहे.