Jalgaon News : नगरदेवळ्यातील बसफेऱ्या पूर्ववत करा प्रवाशांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bus News

Jalgaon News : नगरदेवळ्यातील बसफेऱ्या पूर्ववत करा प्रवाशांची मागणी

नगरदेवळा (जि. जळगाव) : नगरदेवळा हे ३५ हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव असून, परिसरातील पंधरा गावांच्या प्रवाशांची (Passenger) येथून ये-जा होत असते. पाचोरा आगारातर्फे नगरदेवळा- मालेगाव ही बससेवा सुरू केली होती. (Passenger demand to restore bus services in Nagardeola jalgaon news)

तिला उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे मिळत होते. त्यामुळे सकाळी चाळीसगाव- मालेगाव तेथून नासिकसह इतरत्र ये-जा करण्याची चांगली सोय झाली होती. परतीच्या प्रवास देखील सुखकर झाला होता.

महाराष्ट्र एक्स्प्रेस कनेक्शन बस सकाळी सहाला तर रात्री पाचोरा येथून साडेआठला होती. त्या मुळे प्रवाशांची गैरसोय दूर होत होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही बसफेरी बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पाचोरा आगार व्यवस्थापकांनी सदर बसफेऱ्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे.