निराधार महिलेकडून 2 हजारांची लाच घेताना तहसीलच्या शिपायाला अटक

तक्रारदार महिला घटस्फोटित आहे.
Bribe News
Bribe Newsesakal
Updated on: 

जळगाव : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. मगन गोबा भोई (रा. वाघनगर, जळगाव) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. (Latest Marathi News)

Bribe News
जळगाव नागरी पतपेढीचा भूखंड ताब्यात; महापालिकेची धडक कारवाई

तक्रारदार महिला घटस्फोटित आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे फार्म स्वीकारणे व इतर कामे या शिपायाकडे आहेत. मंगळवारी (ता. २७) तक्रारदार महिला अर्ज घेऊन तहसील कार्यालयात आली होती. शिपाई भोई याने संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म स्वीकारून मासिक अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. तडजोड होऊन दोन हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार महिलेला संशयिताला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली.

Bribe News
'त्या' वसतिगृहाला सावरकरांचेच नाव; शाहू महाराजांच्या नावाची मागणी फेटाळली

त्यानुसार बुधवारी (ता. २७) दुपारी एकच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुले, शैला धनगर, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींनी तहसील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून दोन हजारांची लाच स्वीकारताच शिपाई भोई याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com