Jalgaon : लोणजे येथून पाण्याच्या मोटारीसह पाईप चोरीला

crime news
crime newsesakal
Updated on: 

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील लोणजे ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळ ठेवलेल्या नादुरुस्त तीन जलपरी मोटार, लोखंडी पाईप व केबल वायर असा एकूण तीन लाखांचा ऐवज अज्ञात भामट्याने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pipe stolen along with water truck from Lonje Jalgaon Latest Marathi News)

crime news
देवपूरचा पूल तुटल्याने अंत्यविधीसाठी ग्रामस्थ राहतात ताटकळत!

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील लोणजे ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर वाघले धरणाजवळ आहे. दरम्यान विहिरीत असलेल्या २५ पॉवर हाऊसच्या तीन जलपरी मोटार नादुरुस्त झालेल्या होत्या. त्यामुळे शनिवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास विहिरीच्या बाजूला पाण्याच्या मोटारीसह सहा लोखंडी पाईप व इलेक्ट्रिक केबल वायर ठेवलेले असताना अज्ञात भामट्याने ते चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी एकूण- ३,०१,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेप्रकरणी लोणजे गावाचे सरपंच बळीराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटा समोर आल्यास त्याला ओळखून घेईल असा विश्वास सरपंच चव्हाण यांनी व्यक केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

crime news
Gauri Pujan 2022 : किन्नरांच्या घरी महालक्ष्मी विराजमान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com