Jalgaon News: मुख्यालयात कर्तव्य बजावताना पोलिसाचा मृत्यू

Govind More
Govind More
Updated on

Jalgaon News : जळगाव पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असताना वॉशरुममध्ये अचानक चक्कर येऊन पडल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी आठ वाजता घडली. गोविंद प्रेमचंद मोरे (वय ५०, रा. नाका रोड धुळे ह.मु. भुसावळ) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Policeman dies while on duty at headquarters jalgaon news)

धुळे जिल्ह्यातील मूळ रहिवासी गोविंद प्रेमचंद मोरे पत्नी व दोन मुलांसह भुसावळ येथे वास्तव्याला होते. जळगाव पोलिस मुख्यालयात नियंत्रण कक्षात ते ड्यूटीवर असताना रविवारी (ता.२६) रात्रपाळी करून सोमवारी (ता.२७) रोजी सकाळी ८ वाजता ऑनड्यूटी असताना ते वॉशरूममध्ये गेल्यावर त्यांना अचानक चक्कर येऊन पडल्याने बेशुद्ध झाले.

त्यांना तातडीने ऑर्किड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

Govind More
Jalgaon Accident News : कंपनीच्या गेटवरच वॉचमनला ट्रकची धडक

त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.

ही घटना नातेवाइकांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Govind More
Jalgaon Accident News : कन्नड घाटात तवेरा गाडी कोसळून चौघांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com