esakal | खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा केंद्राचा डाव
sakal

बोलून बातमी शोधा

Anil patil

खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा केंद्राचा डाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
अमळनेरः एकीकडे शेतकऱ्यांना खोटी सहानुभूती दाखवत दोन हजार द्यायचे आणि दुसरीकडे खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा प्रमाणात वाढवून शेतकऱ्यांकडून वसूल करायचे असा निंदनीय प्रकार केंद्र शासनाने चालविला असून शेतकरी (Farmer) व जनतेला ( Public) लुटणारेच हे सरकार असल्याचा आरोप अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील (MLA Anil patil) यांनी करीत केंद्र शासनाचा (Central Government) निषेध नोंदविला आहे.

(MLA Anil Patil alleges central government robbing farmers and citizens)

हेही वाचा: कोरोनाचा कठीण काळ..आणि तरीही चोपडा बाजार समिती मालामाल !


राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रशासनास निवेदन देऊन खतांच्या भाववाढीचा निषेध करण्यात येत आहे,यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी देखोल तीव्र भावना व्यक्त करत या गंभीर प्रश्नी केंद्र शासनाला चांगलेच फटकारले आहे. तसेच आवळा देऊन कोहळा काढणारे हे सरकार असल्याचा आरोपही केला आहे. यासंदर्भात बोलतांना आमदारांनी सांगितले की डीएपी खत असेल किंवा 20-20-15 असेल कोणत्याही खतांच्या आधीच्या किमती पहा आणि आताच्या किमती पहा यातूनचा तुम्हाला लुटीचा अंदाज येऊ शकेल,आधीच कोरोना लॉकडाऊन मध्ये शेतकरी राजा भरडला गेला असताना त्याला खतांच्या माध्यमातून लुटण्याचा आणि संपविण्याचाच घाट केंद्र शासनाने रचलेला दिसत आहे.

पेट्रोल, गॅस, डिझेलचे दर वाढवून लुट

या शासनाला गरीब शेतकऱ्यांना मदत द्यायचीच नसेल तर देऊ नये त्यावर आमचे म्हणणे नाही पण 1 रुपया द्यायचा आणि दुसऱ्या मार्गाने लागलीच दहा रुपये लुटायचे असली खालची पातळी मुळीच गाठू नये. या दळभद्री आणि लुटारू शासना विरुद्ध आता शेतकरी बांधवांसह जनतेनेही पेटून उठण्याची गरज आहे.या लुटारू शासनाने कोरोनाच्या या कठीण काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती देखील भरमसाठ वाढवून जनतेवर अन्याय केला आहे.

हेही वाचा: कडक उन्हाळ्यातही..परदेशी पक्ष्यांनी वाढविला मुक्काम !

तर..रस्त्यावर उतरणार

लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या वतीने मी या प्रकाराचा निषेध करतो. केंद्र शासनाने याचा फेरविचार न केल्यास लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार अनिल पाटील यांनी दिला आहे

loading image
go to top