esakal | सरत्या वर्षात केवळ एकनाथ खडसे विरुध्द भाजप; आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुराळा !
sakal

बोलून बातमी शोधा

eknath_khadse

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा नेता मिळाला, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेला एक चांगला साथीदार नेता मिळाला.

सरत्या वर्षात केवळ एकनाथ खडसे विरुध्द भाजप; आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुराळा !

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव ः  ‘कोरोना’चा फटका राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर जाणवला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे (Haribhau Jawale) यांचे ‘कोरोना’मुळे झालेले निधन हा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला. या काळात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे संपर्कमंत्री डॉ. के. सी. पाडवी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्ह्याचा दौरा करून ‘कोरोना’ उपचाराची पाहणी केली. तरीही सरते वर्ष खडसे विरुद्ध भाजप या संघर्षाने गाजले. त्याची अखेर खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने व सीडी-ईडीच्या गाजलेल्या चर्चेनेच होते. 

आवश्य वाचा-  घरात पिठ नाही म्हणून चोरले गव्हाचे पेाते; वायरी जाळतांना ते सापडले आणि समोर आल्या घटना -
 

खडसे विरुद्ध भाजप 
गेल्या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध एकनाथ खडसे असेच चित्र दिसून आले. विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरातून एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पक्षावर अगोदरच नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षातील राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली. याशिवाय भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांचा खडसे यांचा अंतर्गत वाद होताच. त्यामुळे कधी नाव घेऊन, तर कधी नाव न घेता एकमेकांवर आरोप सुरू होते. अखेर खडसे यांनी भाजपला रामराम केला अन् शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

आवर्जून वाचा-  हवेत फायरिंग करून दहशत माजविणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या -

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा नेता मिळाला, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेनेला एक चांगला साथीदार नेता मिळाला; परंतु राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येही काही प्रमाणात नाराजी दिसून आली. 

‘सीडी’ आणि ‘ईडी’चे राजकारण 
कोरोनाकाळात सत्ताधारी-विरोधी पक्षांत आरोपाच्या फैरी झडतच होत्या. मुंबई येथे प्रवेश करताना खडसेंनी ‘ईडी’ लावली, तर ‘सीडी’ लावू, असा इशारा दिलाच होता. त्यामुळे जिल्ह्यात ‘सीडी’चे राजकारण सुरू झाले. जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांनी आपल्याजवळ भाजप नेते गिरीश महाजन यांच्या गैरकृत्यांची सीडी असल्याचे जाहीर करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. त्याच वेळी ‘बीएचआर’ ठेवीदारांच्या रकमेच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली अन्‌ जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. खडसेंनी आपल्याकडे नेत्यांच्या भाजप नेत्यांच्या गैरप्रकाराची ‘सीडी’ आहे. तसेच या बीएचआर प्रकरणात याच भाजप नेत्यांचा संबंध असल्याचे जाहीरपणे सांगून राज्यात खळबळ उडवून दिली, तर ॲड. विजय भास्कर पाटील यांनी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या जमिनीसाठी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह काही जणांनी आपल्याला पुणे येथे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल गेला. त्याच वेळी ॲड. पाटील यांनीही महाजन यांच्य गैरकृत्याची सीडी व पेन ड्राइव्ह असल्याचे पत्रकार परिषदेत सागून सीडी प्रकरणात हवा भरली. 

वाचा- भूखंडाच्या विषयांवरून नगररचना’चे काढले वाभाडे, ‘वकिलां’वरही संशय -
 

‘ईडी’चे राजकारण 
त्याच वेळी एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ‘ईडी’ची नोटीस आली आणि पुन्हा राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी खडसे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता आपण ‘ईडी’च्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे चौकशीनंतर खडसे कोणती सीडी काढणार, त्यानंतर महाजन पुढे काय करणार हे येत्या वर्षात दिसून येईल.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे