धुळीचे प्रदूषण उठले नागरिकांच्या जिवावर; श्‍वसनाचे विकार वाढले 

धुळीचे प्रदूषण उठले नागरिकांच्या जिवावर; श्‍वसनाचे विकार वाढले 

जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटारांच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन धुळीचे प्रदूषण दुपटीने वाढले आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, श्‍वसनविकाराशी संबंधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 
 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावल्यानंतरही प्रशासन ढिम्म असून, ही अमृतची कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम सुरू आहे. वर्षभरापासून त्यात भर पडून भुयारी गटारांचे काम सुरू झाले असून, या दोन्ही कामांमुळे शहरातील रस्त्यांची वाट लागून धुळीचे प्रदूषण वाढले आहे. 

असे वाढले विकार 
वातावरणात डोळ्यांना दिसणारे धूलिकण १० मायक्रॉनपेक्षा अधिक आकाराचे असतात. श्‍वसनयंत्रणेत अडथळा आणणारे घातक धूलिकण २.५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे असतात. हे धूलिकण थेट नाका-तोंडाद्वारे श्‍वसननलिकेतून फुफ्फुसांपर्यंत जातात. त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होऊन, फुफ्फुसांची क्षमताही कमी होते. अस्थमा, ॲलर्जिक सर्दी, खोकला यांसारखा त्रास या धूलिकणांमुळे वाढीस लागतो. 
 

महापालिकेस नोटीस 
गेल्या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या धूळ प्रदूषणाबाबत महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी नोटीस बजावली आहे. याबाबत नियमित बैठकीतूनही इशारा देण्यात आला. मात्र, प्रशासन याप्रश्‍नी अगदीच ढिम्म आहे. 

गेल्या शहरात धुळीचा त्रास ज्‍या प्रमाणात वाढला, त्‍याचप्रमाणे फुफ्फुसाशी संबंधित विविध आजारदेखील वाढले आहेत. धूळ श्‍वासामार्फत फुफ्फुसापर्यंत पोचते. यामुळे ऑक्सिजनची देवाणघेवाण कमी होऊन कार्यक्षमता कमी होत असते. फुफ्फुसाचे आजार तसेच ॲलर्जीशी संबंधित आजारदेखील उद्‌भवत आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना डोळ्यांव्यतिरिक्त पूर्ण चेहरा झाकला जाईल, नाका-तोंडावर मास्क राहील याची काळजी घ्यावी. 
-डॉ. नरेंद्र जैन, एमडी

 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com