Potholes on National Highway.
Potholes on National Highway.esakal

Jalgaon News : ‘बायपास’ सुसाट, महामार्गावर खड्डेच खड्डे; महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

Jalgaon News : शहरातून नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने शहरालगत ‘बायपास’ मार्गाचा पर्याय अवलंबला.

त्यामुळे मुख्य रस्त्यावर दळणवळण करणारी अवजड वाहनांची गर्दी कमी झाली.(potholes on highway due to neglect of highway authority jalgaon news )

बायपास चकाचक झाला असला तरी दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाला असून, याकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळा यावरून रहदारी करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा सामना करून वाहन चालावे लागत आहे. पारोळा शहरालगत कासोदा चौफुली, चोरवड चौफुली, कजगाव चौफुली, अमळनेर चौफुली अशा चार चौफुल्या येत असतात.

तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत हॉटेल ग्रीन पार्कजवळ वळण रस्ता असल्यामुळे या परिसरात जागोजागी खड्डे पडल्यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना देखील संबंधित विभाग राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष का करीत आहे, हा चिंतनाचा विषय ठरला आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून पारोळा शहराचा बायपास सुरू करण्यात आला. मात्र मुख्य रस्त्यावर शहराचे बसस्थानक असल्यामुळे यावेळी राष्ट्रीय महामार्गावर बस, शहरात येणारी वाहने तसेच शैक्षणिक संकुलांचे स्कूलबस, ग्रामीण भागातील वाहने तसेच दुचाकी चारचाकी यांची वर्दळ असते. त्यामुळे मुख्य रस्त्यांच्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ याबाबत अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Potholes on National Highway.
Jalgaon News : ‘इस्त्रो’च्या सफरीत रमले भावी शास्त्रज्ञ; महाराष्ट्रातील 61 विद्यार्थ्यांची भेट

खड्डे जीवघेणे

शहराच्या प्रवेशादरम्यान शासकीय रुग्णालय, तहसील कार्यालय, शैक्षणिक संस्था, बसस्थानक व शासकीय कार्यालय, पोलिस ठाणे, न्यायालय व ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी चार ठिकाणच्या चौफुल्या आहेत, असे असताना देखील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करत खड्डा चुकवत वाहन चालवावे लागत आहे. यासाठी संबंधित विभागाने राष्ट्रीय महामार्गावरील पारोळा शहरालगत असलेले खड्डे तत्काळ बुजवावे, अशी मागणी होत आहे.

‘छावा’खड्ड्यांवर झाडे लावणार

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे संबंधित विभागाने आठ दिवसांत दुरुस्त न केल्यास छावा संघटना संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी म्हणून खड्ड्यांवर झाडे लावणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, शहरात श्री बालाजी महाराजांचा नवरात्रोत्सव सुरू आहे. तर २५ रोजी रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात भाविक श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव पाहण्यासाठी येतात. त्यामुळे महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Potholes on National Highway.
Jalgaon News : घरबसल्या काढा ‘डिजिटल शिधापत्रिक्रा’; कार्डासाठी ‘नो एजंट’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com