Ambedkar Jayanti 2023 : आंबेडकरांच्या प्रवासात देशाचा विकास केंद्रस्थानी : प्रा. दीपक गायकवाड

Dr Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb AmbedkarSakal

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासात भारत आणि भारताचा विकास हाच मुख्य विचार केंद्रस्थानी होता, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त प्रा. दीपक गायकवाड यांनी केले. (Prof Deepak Gaikwad statement about Ambedkar journey centered on development of country jalgaon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी डॉ. गायकवाड यांचे ‘राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. म. सु. पगारे, प्रा. आर. जे. रामटेके, डॉ. निशा गायकवाड, समन्वयक प्रा. रमेश सरदार उपस्थित होते.

प्रा. गायकवाड म्हणाले, की राष्ट्रीय व सामाजिक चळवळी या देशाच्या विकासात समांतर राहिल्या आहेत. बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत या प्रवासात भारत हा शब्द केंद्रस्थानी ठेवला. जिथे जिथे भारतीय संस्कृतीची पेरणी करता येईल ती त्यांनी केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dr Babasaheb Ambedkar
Ambedkar Jayanti 2023 : डॉ. आंबेडकरांच्या 132 मूर्तींचे वितरण

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजही देशाच्या प्रगतीसाठी गरज आहे. शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही. याची त्यांना जाणीव होती, असे मत त्यांनी मांडले. भालचंद्र सामुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. म. सु. पगारे यांनी आभार मानले.

निबंध स्पर्धेतील विजेते

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक धवल सूर्यवंशी (रसायनशास्त्र प्रशाळा), द्वितीय सुवर्णा भालोदकर (व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा), तृतीय ज्योती सोनवणे (शिक्षणशास्त्र प्रशाळा) हे पारितोषिक विजेते ठरले.

जल्लोषात मिरवणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रचंड जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर यांच्या वेशभूषेत समाधान वाघ, शालिनी मोरे, फैजान पटेल आणि कविता ठाकरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशासकीय इमारतीजवळ या मिरवणुकीचा समारोप झाला.

Dr Babasaheb Ambedkar
Ambedkar Jayanti 2023 : बाबासाहेबांनी जातीय विषमतेच्या श्रुंखला तोडल्या : साहित्यिक मनोहर आंधळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com