SET Exam : पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा उद्या; परीक्षेचे प्रवेशपत्र येथून करा Download | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

set exam

SET Exam : पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा उद्या; परीक्षेचे प्रवेशपत्र येथून करा Download

जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत जळगाव शहरातील आठ केंद्रांवर ३८ वी राज्यस्तरीय (SET) सेट (राज्यस्तरीय पात्रता चाचणी) परीक्षा रविवारी (ता. २६) होणार असून, तीन हजार ६०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. (Pune University SET Exam will be on 26 march jalgaon news)

मुळजी जेठा महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद भवन-अ आणि ब, केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर, केसीईचे अभियांत्रिकी महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, केसीईचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ओरियन सीबीएसई स्कूल या आठ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

परीक्षेचे प्रवेशपत्र setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा अर्ज भरताना वापरलेला लॉगीन व पासवर्डचा उपयोग करून हे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास अडचण आल्यास सेट परीक्षेचे संपर्क व्यक्ती तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील (९४२३१८५०७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.

टॅग्स :JalgaonSPPUSET Exam