चोपडा-जळोद रस्त्यावरील रेल्वेगेट बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले अमळनेर रेल्वेगेट.

चोपडा-जळोद रस्त्यावरील रेल्वेगेट बंद

अमळनेर - येथील उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू केल्याने चोपडा व जळोद रस्त्यावरील रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अमळनेरहून गडखांब, पातोंडा, सावखेडा, चोपडा, जळोद, गांधली, अमळगाव, हातेड, अनवर्दे, बुधगाव, अनेर, वेळोदे, लासूर, गणपूर, शिरपूर, वाळकी आदी गावांना शहराबाहेरील रेल्वेगेट क्रॉस करून जावे लागत होते. रेल्वेगाड्यांची वर्दळ वाढल्याने अनेकदा १५ ते २० मिनिटे थांबावे लागत होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊन अपघात देखील होत होते. म्हणून अंबर्षी टेकडीच्या शेजारी रेल्वेरुळावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने आता रेल्वेगेटची आवश्यकता नसल्याने रेल्वे प्रशासनाने हे रेल्वेगेट १८ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Railway Gate Closed On Chopda Jalod Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top