अमळनेर तालुक्यात वादळासह पाऊस, गारपीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain, heavy storm

अमळनेर तालुक्यात वादळासह पाऊस, गारपीट

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील अंतुर्ली परिसरासह रंजाणे, तासखेडा भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मांडळ परिसरातही सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. गारपीटमुळे बागायती शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी कपाशीचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अमळनेर शहरात काही वेळ वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वीज तारा तुटल्या होत्या. वीजखांब वाकले होते. झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठख खंडित झाला आहे. धार रस्त्यावर एका ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने ट्रॅक्टरचे नुकसान झाले. दरम्यान, या पावसामुळे उन्हाच्या उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: चाळीसगावात ४८ तासांपासून अंधार

हेही वाचा: कृषी विभागाच्या छाप्यात बोगस बियाणे जप्त; 3 दिवसात दुसरी कारवाई

Web Title: Rain With Hail Hailstorm In Amalner Taluka In Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonrainMonsoon
go to top