Jalgaon Crime News : 30 हजारांच्या उसनवारीपोटी मागितली 5 लाखांची खंडणी

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on: 

जळगाव : कानळदा रोड येथील रहिवासी जब्बार खान गफ्फार खान (वय २८) यांच्या शालकाने आईच्या उपचारासाठी घेलेल्या ३० हजारांच्या मोबदल्यात पाच लाखांच्या खंडणीची मागणी गुंडाकडून करण्यात आली. कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार अट्टल गुन्हेगारांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

लक्ष्मीनगर-कानळदा रोड भागात वास्तव्यास असलेल्या जब्बार खान गफ्फार खान यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, बुधवारी (ता. १९) सायंकाळच्या सुमारास रॅन्चू भिकन शेख, फारुख नूर शहा, मन्या (पूर्ण नाव माहीत नाही), जुबेर ऊर्फ डबल भेज्या भिकन शेख (सर्व रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे चौघे अचानक त्यांच्या घरात शिरले.(ransom of 5 lakhs demanded for usanwari of 30 thousand Jalgaon Latest Crime News)

Nashik Crime News
Jalgaon : अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वारसदांराचा तीव्र संताप!

‘तुझा शालक शाकिर याने आमच्याकडून घेतलेले पैसे तो, परत देत नाही. म्हणून आता तूच आम्हाला पाच लाख रुपये दे अन्यथा तुझी पत्नी व शालक यांना ठार करू’ अशी धमकी देत पैसे देण्यास नकार दिला म्हणून बेदम मारहाण करून जखमी केले.

जखमी जब्बार खान यांनी शालकास विचारणा केली असता, त्याने आपण आईच्या उपचारसाठी संबंधितांकडून केवळ ३० हजार घेतल्याची कबुली दिली. जखमी जब्बार खान यांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चौघा संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Nashik Crime News
Jalgaon PI Beating Case : त्या मारहाण प्रकरणात DYSPच अनभिज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com