Latest Jalgaon News | रेडिमेड कापड दुकानाला आग; 60 लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mudra NX readymade clothing shop burned by fire.

Jalgaon : रेडिमेड कापड दुकानाला आग; 60 लाखांचे नुकसान

पाचोरा (जि. जळगाव) : येथील गजबजलेल्या बसस्थानक रस्त्यावरील मानसिंगका मिल गेटसमोरील गणेश प्लाझामधील मुद्रा एनएक्स या रेडिमेड कापडाच्या दुकानास शनिवारी (ता. ५) रात्री आग लागून फर्निचरसह सुमारे ६० लाखांचे कपडे खाक झाले. यामुळे कर्ज काढून व्यवसाय करणाऱ्या राहुल मोरे या तरुणावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. (Readymade cloth shop fire 60 lakhs loss Latest Jalgaon News)

हेही वाचा: Chhagan Bhujbal : माजी मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

नोकरी मिळत नाही, म्हणून शिक्षित असलेल्या राहुल मोरे याने कर्ज काढून रेडिमेड कापड विक्रीचे दुकान थाटले. दिवाळीनिमित्त दुमजली दुकान व मागील गुदामात प्रचंड माल भरला होता. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून राहुल मोरे घरी गेले. रात्री एका रुग्णवाहिकाचालकाला दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस व ओळखीच्या मीडिया प्रतिनिधींना माहिती दिली.

राहुल मोरे यांना कळविण्यात आले. तोपर्यंत आगीने रूद्रावतार धारण केला. विशेष म्हणजे पाचोरा पालिकेचे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आला. मात्र, त्यात बिघाड झाल्याने आगीवर पाण्याचा मारा करता आला नाही. त्यामुळे आग प्रचंड भडकली. भडगाव पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. या ठिकाणी एकमेकांना लागून दुकाने असल्याने आगीची झळ इतर दुकानांना बसू नये, म्हणून उपस्थित बादल्या व डब्याने आगीवर पाणी मारत राहिले.

मात्र, दुमजली दुकानासह गुदामातील सर्व कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य खाक झाले. सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले असून, दुकानदार राहुल मोरे यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शॉकसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलिस, महसूल व विमा कंपनीने आगीचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा: Nashik : येवल्यात उन्हाळ कांदा बाजारभावात वाढ

टॅग्स :JalgaonFire Accident