
Jalgaon : लोक अदालतीत 41 लाखांची वसुली
पारोळा (जि. जळगाव) : येथील न्यायालयात (court) शनिवारी (ता. ७) लोकअदालतीचे (Peoples Court) आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश एम. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व न्यायाधीश प्रकाश महाळणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अदालतीत एकूण ३८ प्रकरणांचा निपटारा करून ४१ लाखांची वसुली (Recovery) करण्यात आली. (Recovery of Rs 41 lakh in peoples court in Parola Jalgaon News)
या वेळी पंच ॲड. अशोक पाटील,सतीश पाटील उपस्थित होते. या लोकअदालतीत न्यायालयात दाखल ८३ दिवाणी प्रकरणे तडजोडी ठेवली होती. त्यात पाच प्रकरणे निकाली निघून तीन लाख २ हजार ७६३ रुपये वसुली झाले तर १३९ फौजदारी प्रकरणे ठेवली होती, त्यात चार प्रकरणे निकाली काढून एक लाख रुपये वसूल झाले. एकूण २२२ प्रकरणांपैकी नऊ प्रकरणे निकाली निघून चार लाख २ हजार ७६३ रुपये वसूल झाले तर दाखलपूर्व १ हजार ७८३ प्रकरणे ठेवली होती. त्यात २९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या ३६ लाख ५६ हजार ३४६ रुपयांची तरतूद करण्यात आली तर २ हजार ५ प्रकरणांपैकी ३८ प्रकरण निकाली काढून ४० लाख ५९ हजार १०९ रुपये वसूल करण्यात आले.
हेही वाचा: जळगाव : बंद जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी
या वेळी ज्येष्ठ विधिज्ज्ञ अनिलकुमार देशपांडे, ए. आर. बागुल, वकील संघाचे अध्यक्ष भूषण माने, ॲड. तुषार पाटील, अतुल मोरे, वेदव्रत काटे, सतीश पाटील, प्रशांत ठाकरे, पराग शिरसमणे, सचिन पाटील, कृतिका आफ्रे, स्वाती शिंदे, अकिल पिंजारी यासह वकील संघाचे सदस्य तसेच वरिष्ठ सहाय्यक के. जी. कुमावत, कनिष्ठ सहाय्यक पंकज महाजन, कनिष्ठ लिपिक व्ही. एस. मराठे, एच. एस. सोनवणे, एच. सी. संन्यासी, टी. एस. पवार, बेलिफ जी. टी. म्हात्रे, कर्मचारी वाय. पी. शिंदे, डी.पी. देशपांडे, सी. एस. गावंडे, पक्षकार, सेंट्रल बँक, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: Jalgaon : ZP शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बदल !
Web Title: Recovery Of Rs 41 Lakh In Peoples Court In Parola Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..